खडकवासला (पुणे) – वंचित बहुजन आघाडी हवेली तालुका पश्चिम विभाग आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाश आंबेडकर यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
खडकवासला मतदारसंघातील कोल्हेवाडी याठीकाणी पहिल्यांदाच ही सभा होणार आहे. याची पूर्व तयारी व सभा होणाऱ्या मैदानाची पहाणी हवेली वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुनिल कांबळे, खडकवासला विधानसभा मंतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उत्तम वनशिव, उपाध्यक्ष उमेश कांबळे, बाळासाहेब भालेराव, राजेंद्र कांबळे, अमोल बावस्कर, मधुकर दुपारगुडे, दिद्धार्थ उगाले, अशोक सोनवणे, सतिश अंभोरे, शिवशरण कदम, विवेक सोनवणे, सनी वाघमारे राहुल हनवले, राहुल धोंडगे, स्वप्नील कांबळे यांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.