मुंबई – टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा बनवणारा बाहुबली म्हणजेच, अभिनेता ‘प्रभास’ बॉक्स ऑफिसवर नेहमीच जादू करतो. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटातील डायलॉग आणि त्याच्या अभिनयाला सिनेप्रेक्षक तुफान दाद देत असतात.
दरम्यान, आज (दि. 14) व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी बाहुबली ऍक्टर प्रभासच्या आगामी ‘राधेश्याम’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला. स्वतः प्रभासने चित्रपटाचा टिझर आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे दिसून येत आहे.
प्रभास पूजासोबत रेल्वे स्टेशनवर फर्ल्ट करत असून, प्रभास स्टेशनवर उंच उडी मारत इटालियन भाषेत Sei Un Angelo? Devo Morire per incontrarti? बोलत प्रेयसी पूजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर भेटल्यावर पूजा प्रभासला बोलते तू स्वत:ला रोमियो समजतोस का असं बोलते.
View this post on Instagram
‘राधेश्याम’ चित्रपटात अभिनेत्री ‘पूजा हेगडे’ मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले असून 30 जुलै 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाची पहिली घोषणा झाल्यापासून चाहते प्रभास आणि पूजाचा रोमांस पाहण्यासाठी उत्सुक आहेत.