मुंबई – कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभुदेवाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रभुदेवा चौथ्यांंदा बाप बनला आहे, त्याची दुसरी पत्नी हिमानी हिचे हे पहिलेच मूल आहे. जिच्याशी त्याने 2020 मध्ये लग्न केले होते. याबाबत प्रभुदेवा म्हणाला, ‘हो! ते खरे आहे. या वयात म्हणजे ५० व्या वर्षी मी पुन्हा वडील झालो आहे. मी खूप आनंदी आहे आणि माझ्या घरी लक्ष्मी आली आहे.’
पहिल्या लग्नातून त्याला तीन मूल आहे. मुलीच्या येण्याने खूपच आनंदी आहे प्रभुदेवा जास्तीत जास्त वेळ घरी घालवणार असल्याचे त्यांने सांगितले आहे,
तसेच प्रभुदेवा पुढे म्हणाला, ‘मी माझ्या कामाचा ताण आधीच कमी केला आहे. मला वाटले की मी खूप काम करत आहे, फक्त धावत आहे. माझे काम झाले आहे. मला माझ्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे.’ प्रभू आपला वेळ मुंबई आणि चेन्नईमध्ये घालवतो. दोन्ही शहरांमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून त्यांची चमकदार कारकीर्द आहे.’
वृत्तानुसार, प्रभूदेवाने हिमानीसोबत २०२० साली गुपचूप लग्न केल. हिमानी सिंह ही पेशाने डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभूदेवाचं पहिलं लग्न १९९५ साली रामलताशी केलं होत. रामलता शास्त्रीय नृत्यांगना होती. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.