हुआ कुओ फेंग हेच माओंचे वारसदार
टोकियो, दि. 29 – चीनचे पंतप्रधान हुआ कुओ-फेंग हेच आता माओंच्या नंतर नेतेपती राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे पेकिंकमधून येथे आल्यावर अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स श्लेसिंजर यांनी सांगितले.
योग्य वेळी निवडणुका जाहीर करू – इंदिरा गांधी
नवी दिल्ली – माझ्या सरकारची देशातील निवडणुका टाळण्याची इच्छा नाही, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या. परंतु, सरकार निवडणुकीची वेळ योग्य ठिकाणी घोषित करील, असे त्या म्हणाल्या. भारतीय वृत्तपत्रांवरील प्रसिद्धीपूर्व नियंत्रण आम्ही उठविले आहे.
शहर पुनर्रचना योजना,केंद्रीय अधिकाऱ्यांची पुणे शहरात पाहणी सुरू
पुणे – सुरळीत नागरी जीवनासाठी 3 लाख लोकवस्तीच्यापेक्षा जास्त वस्ती असलेल्या शहरांची पुनर्रचना करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेनुसार प्रत्यक्ष पाहणीस शहरात आज प्रारंभ झाला. नगररचना खात्याचे मुख्य केंद्रीय अधिकारी आज पुण्यात दाखल झाले आहेत. 5व्या योजनेत शहर पुनर्विकासाचा समावेश करण्यात आला आहे.
माझ्या वाढदिवसाच्या समित्या स्थापू नका
नवी दिल्ली – नोव्हेंबरमध्ये माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणतीही समिती स्थापन करू नये, असे इंदिरा गांधी म्हणाल्या.