Prabhas – कन्नप्पा या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटात शिवभक्त कन्नप्पा यांची कथा सांगतोय. ज्यांना थिनाप्पन, थिन्नन, धीरा, कन्यन, कन्नन इत्यादी नावानेही ओळखले जाते.
या चित्रपटात तेलगू अभिनेता विष्णू मंचू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर प्रभाससह इतर काही स्टार्स कॅमिओमध्ये दिसणार आहेत. कन्नप्पाचे पोस्टर रिलीज होताच प्रभासच्या चर्चेला उधाण आले आहे.
Step into the world of 𝐊𝐚𝐧𝐧𝐚𝐩𝐩𝐚 where the journey of an atheist Warrior to becoming Lord Shiva’s ultimate devotee comes to life🏹@kannappamovie @24framesfactory @avaentofficial@ivishnumanchu @themohanbabu @Mohanlal @NimmaShivanna #Prabhas#Kannappa🏹 #HarHarMahadevॐ pic.twitter.com/kRbebbZdbH
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) November 22, 2023
कन्नप्पा किंवा चित्रपटाचे अधिकृत पोस्टर्स रिलीज होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर्स इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. हा पॅन इंडिया चित्रपट असणार आहे, जो फक्त हिंदीत दाखवला जाईल. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक व्यक्ती हातात धनुष्य घेऊन निशाणा साधताना दिसत आहे. जंगल आणि धबधब्याच्या साहाय्याने शिवलिंगाचे दर्शन होते. पोस्टरमध्ये दिसणारा पुरुष चेहरा कन्नप्पा आहे, मुख्य भूमिका विष्णू मंचूने साकारली आहे.
रिपोर्ट्सनुसार, कन्नप्पा या चित्रपटात प्रभासचा कॅमिओ दिसणार असून तो या चित्रपटात भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी आता सोशल मीडियावर याबाबत चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान प्रभासचा सालारही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या काळात सालार नंतर तो कल्की 2898 या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.