मुंबई – बाहुबलीमध्ये प्रभासची बॉडी खरोखरच ट्रेंडसेटर होती. प्रभास आहार नियोजन आणि कठोर प्रशिक्षणामुळे बाहुबलीसाठी आपल्या बॉडीमध्ये एक परिवर्तन घडवून आणू शकला. व्यावसायिक बॉडीबिल्डर लक्ष्मण रेड्डी यांच्या देखरेखीखाली असलेल्या चित्रपटातील भूमिकेसाठी निर्मात्यांनी प्रभासला तब्बल 1.5 कोटी रुपयांची जिम उपकरणे भेट दिल्याचे समजते.
बाहुबलीच्या शुटिंग दरम्यान प्रभास दिवसाला एकूण 2000 ते 4000 कॅलरी मिळतील इतका आहार करायचा. त्यामुळे या स्टारच्या दैनंदिन आहार योजनेत मासे, अंड्याचा पांढरा भाग, भाज्या आणि बदाम यांचा समावेश होता. प्रभास दिवसातून अनेकवेळा जेवण करायचा पण त्याच्या आहारात भाताचा समावेश नव्हता.
प्रभास ‘बाहुबली 1’ साठी 4 वर्षांपासून बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करत आहे: बॉडीबिल्डर श्री रेड्डी यांनी खुलासा केला, अमरेंद्र बाहुबलीची भूमिका करण्यासाठी प्रभासचे वजन सुमारे 100 किलो होते, परंतु शिवुडू म्हणून, त्याला एक दुबळा मुलगा वाटण गरजेचं होत. पण बाहुबली योद्धा बनण्यासाठी बॉडीची गरज होती. यासाठी प्रभासला खूप मसल्स गेन करावे लागले. चार वर्षांहून अधिक काळ त्याच्या शरीरात चढ-उतार होत होते, जे सोपे नव्हते.
श्री रेड्डी यांनी खुलासा केला की ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि त्याच्या सिक्वेलसाठी प्रभासचे प्रशिक्षण सत्र, शूटिंगचे वेळापत्रक आणि आहार पूर्णपणे विरुद्ध होता. प्रभास अंड्याचा पांढरा भाग, चिकन, नट, बदाम, मासे आणि भाज्या असे सहा प्रकारचे जेवण करायचा. बाहुबलीच्या तयारीसाठी, त्याने दिवसातून आठ वेळा जेवण घेतले तेही पनीर आणि मटण सह कार्ब-हेवी.
संध्याकाळी, प्रभास ट्रेनिंग प्रशिक्षण सत्रे अटेंड करायचा ज्यामध्ये डेडलिफ्ट्स, स्क्वॅट्स, बेंच प्रेस आणि इतर कठीण व्यायामांचा समावेश होता. 2015 मध्ये बाहुबली: द बिगिनिंग रिलीज झाल्यानंतर प्रभासला मेहनतीचे फळ मिळाले आणि सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.