मुंबई – साऊथ स्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकही खुश झाले आहेत म्हणूनच सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच हजार कोटींचा टप्पा ओलांडेल असा दावा बोलीववूड एका अभिनेत्याने केला आहे.
केआरके अर्थात कमाल आर खान हा नेहमीच चित्रपटांची समीक्षा करताना दिसून येतो. त्याने आपल्या एका ट्विटमध्ये आदिपुरुषच्या कमाईबाबत भाष्य केले आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हणतो,”प्रभासचा चित्रपट आदिपुरुष पहिल्या दिवशी 150 कोटींची कमाई करेल आणि पहिल्या आठवड्यात चित्रपट जगभरात 1000 कोटींची कमाई करेल. कारण प्रभासची साऊथमध्ये एसआरके पेक्षा अधिक क्रेझ आहे.”
चित्रपटाची वाट पाहणारे प्रेक्षक त्याच्या ट्विटवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.यावेळी केआरकेने ट्विटमध्ये प्रभास आणि शाहरुखचा उल्लेख केल्यामुळे त्याच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे.
According to reports #Adipurush can do ₹150Cr business on day1 in India only. It can do ₹1000Cr business in first week. @PrabhasRaju is having more craze than #SRK in south. pic.twitter.com/LGjGxntrET
— KRK (@kamaalrkhan) May 18, 2023
आदिपुरुषमध्ये अभिनेता प्रभास राम, क्रिती सेनन सीता आणि सनी सिंग या चित्रपटात लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत.