मुंबई – साऊथ स्टार प्रभास आणि क्रिती सिनॉन रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरु आहेत. दोघेही लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सोबत झळकणार आहेत. बाहुबली नंतर प्रभासचा हा आणखी एक मेगा बिग बजेट सिनेमा असणार आहे. सध्या क्रिती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान वरून धवनने तिच्या आणि प्रभासच्या नात्याबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे.
वरून आणि क्रिती आपल्या भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झलक दिखलाजा १० च्या सेटवर पोहचले होते. हा शो करण जोहर,माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही जज करतात. यावेळी वरुनला विचारण्यात आले की,क्रितीचे नाव तुझ्या लिस्टमध्ये आहे का ? त्यावर वरून म्हणतो,क्रितीच नाव कोणाच्या तरी हृदयात आहे, जो सध्या मुंबईत नाही आणि दीपिकाबरोबर शूटिंग करत आहे. वरुणने दिलेले हे सर्व संकेत अभिनेता प्रभासबाबत होते कारण सध्या तोच दीपिकासोबत शूट करतोय.
Whaaaaaaattt 😯😁🥰💖…… Joo meyy soch raha hoo, voo aap log bii?!😌😹🤔🤔. #KritiSanon #Prabhas𓃵 !! #ProjectK 🪐 pic.twitter.com/F3s91EyFwe
— Jai Kiran💕Adipurush🏹 (@Kiran2Jai) November 27, 2022
वरुणच्या उत्तरावर मात्र क्रितीने थेट डोक्यालाच हात लावला आणि यावर क्रितीने प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रभास क्रिती एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता वरुणने सूचक विधान करत या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे.