दीपिका पदुकोण आणि प्रभासच्या चाहत्यांना एक गुड न्यूज आहे. हे दोन्ही स्टार कलाकार एका चित्रपटात काम करणार आहे. याबाबत वैजयंती फिल्म्सकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे टेंटेटिव्ह टायटल “प्रभास 21′ असे निश्चित करण्यात आले आहे.
हा चित्रपट विज्ञान कल्पित शैलीतील असणार आहे. हा चित्रपट निर्माता नाग अश्विन साकारणार असून हा बिग बजेटचा चित्रपट असेल. विशेष म्हणजे या चित्रपटातून दीपिका आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या दोन्ही सुपरस्टार्स एकत्र पाहणे खूप रोमांचक ठरणार आहे.
या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होईल आणि 2022 मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन अद्याप सुरू झालेले नाही. देशातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चित्रपट निर्मितीचा निर्णय घेण्यात येणार आहे.