श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. त्यातच आता पलक तिवारी बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा होती.
आता तिने आपल्या डेब्यू चित्रपटाची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओत पलक तिवारीचा जबरदस्त अंदाज पाहण्यास मिळत आहे. या चित्रपटासाठी चाहते खूपच एक्साइटेड आहेत.
पलक तिवारीच्या आगामी “रोजी’ चित्रपटाच्या पोस्टरवर तिचा जबरदस्त लुक दिसत आहे. या व्हिडिओत ती कॉम्प्यूटरसमोर बसून एखाद्या जासूसांसारखी पोज देताना दिसते. ज्यात तिच्या चेहऱ्यावर राग असल्याचे दिसते. या चित्रपटात तिच्यासोबत विवेक ओबेरॉय मुख्य भूमिका साकारत आहे.
या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भीती, उत्साह आणि स्वतःचा अभिमानही वाटतो.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. दरम्यान, पलक आपल्या इंस्टाग्रामवर सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असती. तिचे फोटो आणि व्हिडिओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत असतात.