बॉलिवुडच्या बोल्ड आणि ब्युटीफूल नायिकांची यादी करायला कोणी घेतली तर कोणाचे नाव घेणार असा प्रश्न पडणार नाही. कारण नायिका बनण्यासाठी मुळात ही पात्रता असावीच लागते.
हा पण त्यातल्या त्यात अग्रस्थानी कोण असावे याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र एक नाव असे आहे की कदाचित त्याबद्दल फारसा वाद होणार नाही. ते म्हणजे जॅकलीन फर्नांडीस.
लक्षात घ्या ही यादी बोल्ड आणि ब्युटीफूलची आहे. अभिनयाची नाही. असो. तर जॅकलीन हल्ली सगळीकडे दिसते. सलमानच्या प्रत्येक चित्रपटात दिसते. त्याच्या फार्म हाउसवरही दिसते. तो तिचा प्रश्न. पण राधेतही ती झळकली.
तिच्यालायक रोल नसला तर एखाद्या गाण्यात घेऊन चित्रपटाची श्रीमंती वाढवली जाते. त्यामुळे राधेत झळकलेली जॅकलीन विस्मृतीत जायच्या अगोदर पुन्हा वात पेटवून गेली. तर हीच जॅकलीन आता पुन्हा एका पोस्टरमुळे आज सगळ्याच सोशल माध्यमांवर आणि बहुतेक प्रिंट माध्यमात झळकली आहे.
हे पोस्टर आहे तिच्या आगामी गाण्याचे. पानी पानी…. जॅकलीन गायिका पण झाली का, असा तुमचा समज झाला असेल तर तो चुकीचा आहे. हे गाणे बादशाहचे आहे. तो भलताच फॉर्ममध्ये आहे गेल्या काही काळापासून. त्याचे अल्बम आणि त्याचा लूक वगैरे वगैरे….
गाण्यांचे बोल अर्थात शब्द काय हा संशोधनाचा विषय. पण बादशाहची गाणी ठेका धरायला लावतात याबाबत सगळ्यांचे एकमत असू शकते. त्याने जॅकलीन सोबत पूर्वीही गेंदा फूल हे गाणे केले होते.
त्याच्या अपार सफलता के बाद आता पानी पानी करताना हे दोघे दिसणार आहे. हॉट जॅकलीन आणि कूल बादशाहच्या या गाण्यावर त्यांचे चाहते तुटून पडतील अशी शक्यता दिसतेय.