मंचर -लांडेवाडी येथे साडेपाच वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक कली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीची आजी (रा. महाळुंगे पडवळ) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, माझी विवाहित मुलगी लांडेवाडी येथे कुटुंबीयांसोबत राहत आहे.
माझ्या बहिणीचा मुलगा पोपट सावळेराम डोंगरे (वय 45 रा. पांगरी माथा, बल्लाळवाडी, ता. जुन्नर) हा नेहमी महाळुंगे पडवळ येथील माझ्या व माझी मुलगी हिच्या लांडेवाडी येथील घरी जात येत असतो. महाळुंगे पडवळ येथे आजीकडे असलेली लहान मुलगी घरी खेळत असताना पोपट डोंगरे याने बुधवारी (दि. 24) तिच्याबरोबर अश्लील कृत्य करून कोणास न सांगण्याची धमकी दिली.
तिला त्रास होऊ लागल्याने गुरुवारी (दि. 25) सकाळी नातीस घेऊन आजी मंचर येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी या अल्पवयीन मुलीवर प्राथमिक उपचार केले. या पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीने महिला दक्षता समितीच्या सदस्या व महिला पोलीस यांच्या समक्ष पोपट सावळेराम डोंगरे याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले करीत आहेत.