लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नदीकाठच्या प्रमुख घाटांसह, शहरात ८३ विसर्जन हौदांवर स्वच्छता तसेच इतर अत्यावश्यक सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यासंदर्भातच उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून टिळक चौक परिसरात पोलिसांनी बंदोबस्ताच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अनेक वरिष्ठ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.