पाकिस्तानात दहशतवाद बहरला : मोदी

मथुरा : दहशतवाद हेच आता तत्वज्ञान बनले असून ती एक जागतिक समस्या बनली आहे. पाकिस्तानात तिची मुळे खोलवर रूजली असून तेथेच दहशतवाद बहरत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली

स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात मोदी बोलत होते. ते म्हणाले, सुमारे शतकभरापुर्वी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोत ऐतिहासिक व्याख्यान दिले. त्यातून आपल्या संस्कृतीची सखोलता जगाला दिसली. त्याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरला अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जग हादरले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात सर्व जगाने उभे ठाकले पाहिजे. दहशतवादाला तोंड देण्यास भारत समर्थ आहे. हे आम्ही यापुर्वी सिध्द केले आहे. या पुढेही आम्ही ते करत राहू

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×