पर्यावरणपूरक विसर्जनावर पुणेकरांचा भर

पुणे  – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे पुणेकरांचा कल वाढत आहे. शहरात गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत तब्बल 49 टक्‍के गणेश मूर्तींचे विसर्जन महापालिकेने उभारलेले हौद तसेच पाण्याच्या टाक्‍यांमध्ये झाले.

यात, 2 लाख 59 हजार 406 मूर्तींचे विसर्जन हौद तसेच टाकीमध्ये झाले आहे. तर, 2 लाख 70 हजार 703 मूर्तींचे विसर्जन नदीवरील घाट, कॅनॉल, नदीपात्र तसेच तलाव आणि विहिरींमध्ये झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या काही वर्षांत शहरातील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा या उद्देशाने महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांकडून या 10 दिवसांत नागरिकांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती केले जाते. याशिवाय, घराच्या घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, यासाठी नागरिकांना महापालिकेकडून 15 टन अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले.

नदी, कॅनॉल विसर्जनाला प्राधान्य
यावर्षी पहिल्यांदाच गणेशोत्सवाच्या दहाही दिवसांमध्ये मुठा नदीत खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने ही स्थिती होती. त्यामुळे अनेक नागरिकांकडून कॅनॉल तसेच नदीत विसर्जन करण्यासही प्राधान्य दिले जात होते. 2018-19 मध्ये कॅनॉलमध्ये सुमारे 1 लाख 9 हजार मूर्तीं विसर्जन झाले. तर यंदा हा आकडा तब्बल 1 लाख 35 हजारांवर गेला. याशिवाय, नदीपात्र आणि विसर्जन घाटांवरही 1 लाख 24 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. प्रामुख्याने नदीत आणि कॅनॉलमध्ये वाहते पाणी असल्याने नागरिकांनी त्या विसर्जनालाही प्राधान्य दिले.

पर्यावरणपूरक विसर्जनावर पुणेकरांचा भर
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2017-18 मध्ये हा 2 लाख 22 हजार तर 2018-19 मध्ये नागरिकांनी हौद तसेच टाक्‍यांमध्ये सुमारे 2 लाख 47 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते; तर 3,887 मूर्ती दान केल्या होत्या. या दोन्ही आकड्यांमध्ये यावर्षी वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये पर्यावरणपूरक विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या तब्बल 2 लाख 59 हजार 406 असून दान केलेल्या मूर्तींची संख्या सुमारे 4 हजार 29 आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पर्यावरणपूरक विसर्जनाकडे नागरिकांचा कल वाढल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे.

दिवसेंदिवस वाढतोय कल

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.