मुंबई – पोलिसांनी रविवारी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत.
या प्रकरणातील अन्य 109 आरोपींनाही न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 8 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला होता. सदावर्ते यांच्या चिथावणीतूनच हा प्रकार झाला होता असा दावा पोलिसांनी केला असून या प्रकारामागे जे षडयंत्र रचण्यात आले आहे.
त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सदावर्ते यांच्या निवासस्थानी झडती घेतली. त्यात नेमके काय सापडले याची माहिती मिळू शकलेली नाही. आंदोलन करणारे निदर्शक खरोखरच एसटीचे कर्मचारी होते की आणखी कोणी बाहेरचे लोक त्यात सहभागी झाले होते याची माहिती पोलिसांनी घेतली आहे.