पुणे – कर्वेनगर येथील मारुती भैरवनाथ मंदिरात चोरी करण्यात आली. यामध्ये मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख 75 हजार आणि एक पितळेची घंटा असा 77 हजाराचा ऐवज चोरण्यात आला. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती भैरवनाथ देवस्थापनाचे व्यवस्थापक सागर तनपूरे (40,रा.कर्वेनगर ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मारूती भैरवनाथ मंदिराच्या आवारात दोन वेगवेगळी मंदिरे आहेत. यातील शितळादेवीच्या मंदिराच्या आवारात एक दानपेटी तर दुसऱ्या मंदिरात गणपती, मारुती, विठ्ठल रुक्मीणी, स्वामी समर्थ आणि भैरवनाथाची मुर्ती आहे.
त्यांच्या पुढे तीन दानपेट्या आहेत. चोरट्याने दोन्ही मंदिराची कुलपे तोडून आत प्रवेश केला. यानंतर चारही दानपेट्या फोडून 75 हजाराची रोकड आणि मंदिरातील पितळेची घंटा चोरुन नेली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करत आहेत.