पुणे – पुणे शहर पोलीस दलातील आणखी एका 56 वर्षीय सहायक पोलीस निरिक्षकाचा सोमवारी करोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात प्रादुर्भावाने प्राण गमावलेला हा तिसरा कर्मचारी आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांनी कसोशीचे प्रयत्न केले होते. हे प्रयत्न सुरू असूनही अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. शहराच्या मध्यवस्तीतील एका पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन केले होते. या पार्श्वभूमीवर या अधिकाऱ्याचा मृत्यू हळहळ निर्माण करणारा आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.