अमरावती – महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिंडे यांना राजापेठ पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या संदर्भात त्यांना आठ दिवसांत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नोटीस बजाविल्याने संभाजी भिंडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भिडे यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता पोलिसांनी संभाजी भिडे यांनी कायदेशीर नोटिस बजावली आहे. पोलीस संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप पोलीस तपासणार असून त्यांच्या आवाजाचे सॅम्पल घेणार आहेत.
या वादग्रस्त ऑडिओ क्लिप संभाजी भिडे यांच्याच आवाजाची आहे का यासाठी भिडे यांच्या खऱ्या आवाजाचे सॅम्पल घेऊन फोरेन्सिकमध्ये पाठवण्यात येणार आहे. यासंबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीआरपीसी कलमानुसार संभाजी भिडे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.