पोलिसांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण

पिंपरी – गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच ते करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी दोन जणांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीगावजत्रा मैदान येथे रविवारी (दि. 4) दुपारी घडली.

शाहनवाज नाजीर बेग (वय 41) आणि शौकत नजीर बेग (वय 42, दोघेही रा. सुंदर कॉलनी, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश पंढरीनाथ सावंत रविवारी (दि. 4) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गणेश सावंत आणि त्यांचे सहकारी सुमीत देवकर हे दोघेजण लुब्रिकेन्ट ऑइल ऍन्ड ग्रीस प्रोसेसिंग सप्लाय डिस्ट्रीबुशन व रेग्यूलेशन ऑर्डर व अत्यावश्‍यक सेवा कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावजत्रा मैदान येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करीत जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक अनगळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.