दिघीत पोलिसाच्या मुलाची आत्महत्या

पिंपरी – राहत्या घरात गळफास घेऊन पोलिसांच्या मुलाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १९) सकाळी दिघी येथे घडली.

धीरज शिंदे (वय २०, रा. चिंतामणी हाऊसिंग सोसायटी, दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आला. धीरज यांचे वडील दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. तसेच ते माजी सैनिकही आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here