नवी दिल्ली – आंध्रप्रदेशमध्ये वायएसआरसीपीने टीडीपीचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला. विधानसभेसोबतच लोकसभा निवडणुकीतही वायएसआरसीपीने चांगले प्रदर्शन केले. सध्या वायएसआरसीपीच्या एका उमेदवाराचा फोटो सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आंध्रप्रदेशच्या हिंदुपूर जागेवरून वायएसआरसीपीचे उमेदवार गोरंता माधव उमेदवार यांनी विजय प्राप्त केला. गोरंता माधव याआधी आंध्रप्रदेशच्या पोलीस सेवेत कार्यरत होते. आता ते खासदार झाले आहेत. सोशल मीडियावरील फोटोमध्ये माधव त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट करत आहे. तर वरिष्ठ अधिकारीही माधव यांना सॅल्यूट करताना दिसत आहेत. हा फोटो २३ मे रोजीचा असून यावेळी मतमोजणी सुरु होती.
दरम्यान, सॅल्यूट करण्याच्या प्रश्नावर माधव म्हणाले कि, मी त्यांचा मोठा फॅन आहे. आम्ही दोघेही एकमेकांचा सन्मान करतो आणि करत राहणार आहे. टीडीपी नेता आणि अनंतपूरचे माजी खासदार जेसी दिवाकर रेड्डी यांनी पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यानंतर गोरंता माधव यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.