वाघळवाडी (वार्ताहर) – सोरटेवाडी (ता. बारामती) येथे आज (दि. 4) नितीन कुलकर्णी यांच्या उसाच्या फडामध्ये ऊसतोडणी कामगार बबन जाधव यांना घोणस जातीचा साप नजरेस पडला. त्यांनी फडमालकांना या संदर्भात कल्पना दिली. त्यांनी त्वरित योग्य उपाययोजना करून विषारी सापास फडातून काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
यंदाचा साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला आहे. ऊस तोडणी कामगारांमध्ये भल्या पहाटे अंधारातच फडामध्ये जाऊन ऊसतोडणी करावी लागत आहे; पण हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे विषारी सापांनी उसाच्या फडातील पाचटामध्ये आसरा घेत घरे केले आहेत, त्यामुळे मजुरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.