पुणे – आघाडीचे ज्वेलर्स असलेल्या पीएनजी सन्सने भगवान शंकरांची प्रतीके असणारी पेंडंट अजय देवगण व तब्बू यांच्या “भोला’ चित्रपटासाठी तयार केली आहेत. या कलेक्शनचे नाव भोला ज्वेलरी कलेक्शन असून, ते पीएनजी सन्सच्या 29 दालनांतून व देशपातळीवर ऑनलाइन उपलब्ध आहे. अजय देवगण याने या कलेक्शनचे अनावरण मुंबईत केले. पीएनजी सन्सने भोला चित्रपटासाठी दागिने क्युरेट केले आहेत.
भगवान शंकरांच्या सर्वांत आवडीचा अलंकार रुद्राक्ष आहे, तर त्रिशूळ, त्रिपुंड व डमरू ही त्यांची प्रतीक चिन्हे आहेत. त्यामुळेच महादेवांच्या प्रतीकांचे भोला ज्वेलरी कलेक्शन पीएनजी सन्सने तयार केले आहे. याबाबत पीएनजी सन्सचे सीएफओ व सीएमओ आदित्य मोडक म्हणाले, की अजय देवगण भगवान शंकरांना मानतात आणि भोला चित्रपटाचा नायक हा भगवान शंकरांचा भक्त आहे. त्यामुळे तो त्यांचे प्रतीक चिन्ह घातले आहे. पीएनजी सन्सने महादेवांची प्रतीकांची पेंडंट तयार केली आहे. त्यात डमरू, त्रिशूळ, त्रिपुंड, रुद्राक्ष यांचा रचनेत वापर केला आहे.
आमच्या डिझायनरनी यावर अभ्यास करून हे पेंडंट तयार केली असून, एकूण सात विविध प्रकार त्यात आहेत. सुरुवातीस सोन्यात भोला ज्वेलरी कलेक्शन उपलब्ध असून, नंतर चांदीतही उपलब्ध केले जाईल. पेंडंटमध्ये सीझेड स्टोन व रुद्राक्षांचा वापर केला आहे. चित्रपटासाठी पैंजणही तयार केली आहेत, असे मोडक यांनी नमूद केले.