पुणे : राज्यस्तरीय पुरस्कारात पीएमपीएलच्या बालेवाडी डेपोला उत्कृष्ट डेपो म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इतर पुरस्कारात उत्कृष्ट परिवहन पुरस्कार मुरुड (रायगड), पंचवटी (नाशिक), यवतमाळ, श्रीवर्धन (रायगड), पेण (रायगड), परभणी या डेपोंना देण्यात आले. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील राज्य परिवहन संस्था पुरस्कार बेस्टच्या बांद्रा डेपोला उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आला.