डिस्कव्हरी चॅनेलच्या ‘Man vs Wild’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकणार

नवी दिल्ली – डिस्कव्हरी चॅनेलचा ‘Man vs Wild’ हा कार्यक्रम जगभर प्रसिध्द आहे आणि याच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेअर ग्रिल्ससोबत झळकणार आहेत. कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रिल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

बेअर ग्रिल्सने प्रोमो शेअर करत म्हटले आहे की, 180 देशातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी बाजू दिसणार आहे. मोदी भारतातील वन्य जीवन पाहणार आहेत. तसेच मोदी पशुसंवर्धन आणि पर्यावरण परिवर्तन याबाबतच्या जागृतेवर बोलणार आहेत. येत्या 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता डिस्कवरी चॅनेलवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

मोदी या कार्यक्रमात पूर्णपणे वेगळ्या वेशभूषेत दिसणार आहेत. या प्रोमोत नरेंद्र मोदी यांनी वेलकम टू इंडिया असं म्हणत बेअर ग्रिल्सचं उत्साहात स्वागत केलं आहे. तसेच प्रोमोदरम्यान मोदी हे बिअर ग्रेल्ससोबत नदीत नाव चालवताना आणि जंगलात सफर करताना दिसत आहेत.

डिस्कव्हरी चॅनलचा हा कार्यक्रम जगप्रसिध्द असून अनेक भाषांमध्ये डब करून दाखविला जातो. नरेंद्र मोदींच्या आधी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामादेखील या शोमध्ये सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.