गुंतवणुकीवर झालेला नफा प्राप्तिकरासाठी कसा मोजाल? (भाग-2)

गुंतवणुकीवर झालेला नफा प्राप्तिकरासाठी कसा मोजाल? (भाग-1)

प्रश्‍न – भांडवली तोटा हा भांडवली नफ्यापेक्षा खूप जास्त झाला असेल तर निव्वळ तोटा आयकर विवरणात नोंदवावा का
उत्तर- गुंतवणुकीवर झालेल्या भांडवली नफ्यातून भांडवली तोटा संपूर्णतः वजा करावा. झालेला सर्व भांडवली नफ्याच्या समोर भांडवली तोटा वजा करता येतो. असे करताना भांडवली तोटा शिल्लक राहिल्यास त्यास पुढे घेऊन जाता येते.

प्रश्‍न – शेअरवरील विक्रीमध्ये झालेला अल्पकाळातील तोटा दीर्घकालीन नफ्यासमोर वजा करतो येतो का?
उत्तर – अल्पकाळात झालेला तोटा हा दीर्घकालीन नफ्यासमोर तसेच अल्पकालीन नफ्यासमोर कमी करता येतो. परंतु दीर्घकालीन तोटा हा फक्त दीर्घकालीन नफ्यासमोरच वजा करता येतो. हा नियम सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी लागू आहे.

प्रश्‍न – शेअर्स विकून झालेला दीर्घकालीन तोटा पुढील येणाऱ्या वर्षातील नफ्यासमोर वजा करता येईल का?
उत्तर – दीर्घकालीन तोटा भविष्यातील पुढील आठ वर्षांपर्यंत पुढे नेता येतो व या आठ वर्षांत ज्या-ज्या वेळी भांडवली नफा होणार असेल त्याच्यातून हा तोट वजा करता येतो. हा नियम शेअर्स आणि इतर गुंतवणुकीसाठी वापरता येतो.

या वर्षापासून दीर्घकालीन भांडवली नफा जर एक लाखांपेक्षा जास्त झाला असल्यास त्यावर दीर्घकालीन भांडवली कर द्यावा लागणार आहे. 31 जानेवारी 2018 पूर्वीपर्यंत झालेला भांडवली नफा शेअर्स व इक्विटी म्युच्यअल फंडांच्या विक्री नंतर झाला असेल तर त्यावर ग्रॅंड फादरिंग इफेक्‍ट नियमाप्रमाणे कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही. मात्र 1 फेब्रुवारी 2018 नंतर केलेल्या गुंतवणुकीवर जर भांडवली नफा अल्पकालीन असेल तर 15 टक्के आणि दीर्घकालीन असेल तर 10टक्के द्यावा लागणार आहे.

2018-19 या आर्थिक वर्षाचे आर्थिक विवरण भरणे प्रत्येक उत्पन्न धारकास बंधनकारक आहे आणि याची तारीख 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.