भाजपात प्रवेश देणे आहे पुण्यात पोस्टरबाजी 

पुणे: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी मेगा भरती सुरू असतानाच. या पक्ष प्रवेशावर टीका करण्यासाठी पुण्यात भाजप प्रवेश देणे, असल्याचे पोस्टर हडपसर परिसरात झळकविण्यात आले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर नेत्याच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच पुण्यातील हे पोस्टर चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, हे पोस्टर विरोधकांनी लावले की या पक्ष प्रवेशाला कंटाळलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, या वरून राजकीय चर्चेला शहरात उधाण आले आहे.


काय आहे पोस्टरवर 

भाजपात प्रवेश देणे आहे अशा आशयाचे हे पोस्टर असून त्यात अटी व शर्थी देण्यात आल्या आहेत. त्यात पहिली अट ईडी व आयकर विभागाची नोटीस आली असणे असून दुसरी त
अट भ्रष्टाचाराचा आरोप आहे तर तिसरी अट सहकार क्षेत्र बुडवाल्याचा अनुभव आहे .
तर पोस्टर वर टीप ही देण्यात आली असून त्यात विचारधारेची कोणतेही अट नाही तसेच आमच्याकडे जागा नसल्यास मित्र पक्षात प्रवेश दिला जाईल असे नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.