नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता कायम असून ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर असणाऱ्या टॉप-10मध्ये त्यांच्या समावेश आहे.
ट्विटर हा एक असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक जण शब्दांत व्यक्त होत असतात. ट्विटरवर असलेल्या शब्द मर्यादांमुळे अनेक जण ट्विटर वापरणे नापसंत करतात. पण याच ट्विटरवर लोकप्रिय असणा-या लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा नाव आहे.
जानेवारी 2023 मध्ये ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर असणाऱ्या लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी स्टॅटिस्टा डॉट कॉम या संकेतस्थळाने जाहीर केली आहे. यामध्ये जगभरातील नेते, कलाकार, उद्योगपती आणि वेगवगेळ्या क्षेत्रातील महत्वाच्या समावेश आहे. कारण नेते, कलाकार मंडळी आणि वेगवगेळ्या क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीच सर्वाधिक ट्विटरचा वापर करत असतात.
दरम्यान, स्टॅटिस्टा डॉट कॉमकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा देखील समावेश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीमध्ये फक्त दोनच राजकीय नेत्यांचा समावेश आहे, ज्यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर आहेत. तसेच या यादीमध्ये ट्विटरचे नवे मालक आणि टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांचेही नाव आहे.