अहमदनगर – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा आहे.
मोदी यांनी दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली. मोदी याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि पंतप्रधान झाल्यावर 2018 साली शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले.
साईबाबांच्या दर्शनानंतर पीएम मोदी यांची शिर्डीत सभा होत आहे. ते जनतेला संबोधित करत आहेत.
अहमदनगर दौऱ्यातील अपडेट्स –
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी साई मंदिरात पाद्यपूजा आणि आरती संपन्न झाली, मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.
– पंतप्रधान मोदींच्या हस्ते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी सुरवातीला मोदी यांनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टर द्वारे पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीजवळील काकडी गावात सभास्थळी दाखल झाले. हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. या ठिकाणी सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत विविध कामाचे उदघाटन देखिल करण्यात येणार आहे.