PM Modi Death Threat। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येतायेत. दरम्यान, या निवडणुकीच्या अगोदर अनेक नेत्यांना धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. राहुल गांधीनंतर चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आलीय.
“केंद्रात काँग्रेसचे सरकार येताच मोदींना ठार मारेन”PM Modi Death Threat।
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्नाटकमध्ये एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. मोहम्मद रसूलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओद्वारे ही धमकी दिली. ज्यामध्ये तो हातात तलवार घेऊन केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर मी पंतप्रधान मोदींना ठार मरेन असे म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील यादगिरी पोलिसांच्या वक्तव्याचा हवाला देत, मोहम्मद रसूल कदारे यांच्या विरोधात सूरपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये त्याने पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलं आहे. याशिवाय सुरपूर पोलीस आरोपींच्या शोधात व्यस्त असून या संदर्भात हैदराबादसह अनेक भागात छापे टाकले जात आहेत.
व्हिडिओद्वारे धमकावण्याची पहिलीच घटना PM Modi Death Threat।
सोशल मीडिया अकाऊंटवर अशाप्रकारे व्हिडिओ बनवून जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट पहिल्यांदाच समोर आली आहे. हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या व्हिडीओचे स्क्रीनग्राब जारी केले आहे. यामध्ये आरोपी व्यक्ती समोर तलवार घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. अनेक वेळा काही लोक प्रसिद्धीझोतात येण्यासाठी किंवा वेडातून बाहेर पडण्यासाठी अशा गोष्टी करतात. पंतप्रधानांसाठी अशा पोस्ट टाकणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस कारवाईत आले आहेत.
अशी धमकी नुकतीच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आली होती. शनिवार, २ मार्च रोजी यूपीची राजधानी लखनऊ येथील पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकृत सीयूजी क्रमांकावर आलेल्या कॉलने दहशत निर्माण केली. नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.