पुणे : आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. तसेच 19 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 76 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यापूर्वी 12 जानेवारी रोजी 15 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या.
पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करून पोलीस दलात मोठे फेरफार करण्यात आले.
पोलीस निरीक्षकांचे नाव आणि कंसात कुठून कुठे बदली झाली
1) नरेंद्र मोरे (प्रशासन ते लष्कर पोलीस ठाणे)
2) संदीपान पवार ( वाहतूक शाखा ते बंडगार्डन पोलीस ठाणे)
3) किरण बालवाडकर (उत्तमनगर ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)
4) दीपाली भुजबळ ( गुन्हे शाखा ते उत्तमनगर)
5) नीलिमा पवार (बंडगार्डन ते वाहतूक शाखा)
6) सुनील झावरे (स्वारगेट ते आर्थिक शाखा)
7)सुरेशसिंग गौड ( मार्केट यार्ड ते स्वारगेट)
8) अरविंद माने (शिवाजीनगर ते आर्थिक शाखा)
9) चंद्रशेखर सावंत (सायबर ते शिवाजीनगर)
10) जयराम पायगुडे (पर्वती ते आर्थिक गुन्हे शाखा)
11) नंदकुमार गायकवाड (दरोडा व वाहनचोरी प्रतिबंध 2 ते पर्वती)
12) राजेंद्र लांडगे (चंदननगर ते नियंत्रण कक्ष)
13) मनीषा पाटील (चंदननगर (गुन्हे) ते चंदननगर)
14) सविता ढमढेरे (बिबवेवाडी ते विशेष शाखा)
15) स्वप्नाली शिंदे (मार्केट यार्ड (गुन्हे) ते मार्केट यार्ड)
16) विनय पाटणकर ( वानवडी ते बिबवेवाडी)
17) गणेश उगले ते (आर्थिक ते पोलीस निरीक्षक कल्याण)
18) संदीप भोसले (कोंढवा ते सायबर)
19) दादा गायकवाड (विश्रामबाग ते वाहतूक शाखा)
20) विजय खोमणे (पर्वती ते सायबर)
21) अजय वाघमारे (खंडणी विरोधी -1 ते वाहनचोरी प्रतिबंध 2
22) रजनीश निर्मल (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा (प्रशासन)
23) गणेश माने (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा (एमओबी)
याचबरोबर 19 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 76 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.