नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पोहोचले आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या.
पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर आहेत.
Prime Minister Narendra Modi arrives in New York on first leg of his official State visit to the United States
During his visit to New York, PM will meet CEOs, Nobel laureates, economists, artists, scientists, scholars, entrepreneurs, academicians, health sector experts today.… pic.twitter.com/4oBgul8EPG
— ANI (@ANI) June 20, 2023
काय म्हणाले पीएम मोदी?
अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा अमेरिका दौरा ही भारत-अमेरिका भागीदारीची विविधता समृद्ध करण्याची संधी असेल. ते म्हणाले की दोन्ही देश एकत्रितपणे सामायिक जागतिक आव्हानांना अधिक मजबूतपणे सामोरे जाऊ शकतात.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून ते अमेरिकेला भेट देत आहेत आणि हे ‘विशेष निमंत्रण’ दोन्ही लोकशाही देशांमधील ही भागीदारी किती महत्त्वाची आणि मजबूत आहे हे दर्शवते.