नवी दिल्ली – पीएम किसान सन्मान निधि योजनेअंतर्ग (PM Kisan Samman Nidhi) देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रूपये आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत केंद्र सरकारतर्फे एकूण 7 हप्ते पाठवण्यात आले आहेत. लवकरच आठवा हप्ता पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर आजच नोंदणी करून घ्या. या योजनेसाठी नोंदणी करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. जाणून घ्या कशी करावी नोंदणी…
ऑनलाइन करू शकता नोंदणी –
आतापर्यंत 11 कोटी 58 लाख शेतकरी या योजनेशी जोडलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन माध्यमाद्वारे घरबसल्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही स्थानिक सेवा सेंटरच्या माध्यमातूनही या योजनेसाठी नोंदणी करू शकता.
अशा प्रकारे करा ऑनलाइन नोंदणी-
– सर्वात पहिले तुम्हाला PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– त्यानंतर Farmer Corner वर जावे.
– येथे ‘नवीन शेतकरी नोंदणी (New Farmer Registration’ पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल.
– त्याबरोबरच कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करा.
– त्यानंतर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये तुमची पूर्ण वयक्तिक माहिती भरा.
– त्यासोबतच बँकेचा तपशील आणि शेतजमीनीविषयीची माहिती भरावी.
– त्यानंतर फॉर्म सबमिट करा.
कधीपर्यंत मिळेल आठवा हप्ता –
होळीनंतर पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, साधारणपणे एप्रिल महिन्यात हा हप्ता मिळेल असी शक्यता वर्तवली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेअंतर्गत एप्रिल – जुलै दरम्यान एक हप्ता, ऑगस्ट ते नोव्हेबर दरम्यान दूसरा हप्ता आणि डिसेंबर ते मार्च दरम्यान तीसरा हप्ता येतो.