भोर – भोर एसटी बस स्थानकांतील आवारात मोठे खड्डे पडल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची अनेक महिन्यांपासीन कुचंबणा सुरू होती. आगारातील खाड्डे बुजवण्याची मागणी होत असतानाही या विषयाकडे आगार व्यवस्थापकांसह कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे काणाडोळा केला होता.
या समस्येची दखल आज (दि. 25) भोर तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेऊन आगारातील 25 ट्रॉली मुरूम टाकून खड्डे बुजवले असल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची समस्या तूर्तास दूर झाली आहे. भोर तालुका शिवसेना पक्ष आणि भोर तालुका समन्वयक भरत साळुंके यांच्या पुढाकाराने ही खड्डे बुजवण्याची मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेत शिवसेनेचे भोर तालुका प्रमुख हनुमंत कंक, भोर शहर प्रमुख नितीन सोनावले, युवा सैनिक समीर घोडेकर, नितीन बुदगुडे, शुभम खोपडे, मंगेश खाटपे, विशाल गुरव, तुषार गोळे, आनंद गोळे, महेश भोमे, विनायक साळुंके, सुरेश गोळे, सचिन चुनाडी, अशोक गोळे, अंकुश गोळे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.
यावेळी आगार प्रमुख प्रवीण इंगवले, वाहतूक निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी, वाहक विजय मोरे, वाहक सहायक गायकवाड, वाहक जगन्नाथ भेलके यांनी शिवसैनिकांचे या उपक्रमाचे स्वागत केले.