वनविभाग करणार 25 हेक्‍टरवर वृक्षारोपन

कलेढोण – कलेढोण, ता. खटाव येथे महाराष्ट्र वन विभाग सातारा, मायणी विभाग यांच्या मार्फत व कलेढोण ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कलेढोण वन क्षेत्र नंबर 837 मध्ये वनविभागामार्फत जुलै महिन्यात लोकसहभागातून वृक्षरोपनाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाने 25 हेक्‍टर क्षेत्र निवडले असून या क्षेत्रावर प्रामुख्याने लिंब, करंज, चिंच, शिशु,आवळा, अशा औषधी व फायदेशीर रोपांची लागवड होणार आहे. अशी माहिती कलेढोण येथील आयोजित बैठकीत वनविभागाने दिली.

या वनक्षेत्रात कुऱ्हाड बंदी, शिकार बंदी, चराई बंदी व वन वणवा बंदी करण्याचे आव्हान परिक्षेत्राचे वनपरिमंडल अधिकारी के. इ. शिंदे यांनी केले. कलेढोण वनक्षेत्र विभागात येत्या काळात भरघोस निधी उपलब्ध करून अनेक कामे लोकसहभाग घेऊन करण्यात येणार आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये अकुशल मजुरांच्या हाताला काम नसल्याने वनविभागामार्फत रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे, अशी माहिती देखील या बैठकीत दिली.

या बैठकीस कलेढोणचे नियतक्षेत्र वनाधिकारी लोखंडे तसेच सेवानिवृत्त वनाधिकार एस. डी. मिरासदार, चेअरमन संजीव साळुंखे, राजन लिगाडे, पत्रकार नदीम व शिकलगार दीपक नामदे, तानाजी आतकरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.