भारत नाहीतर ‘हा’ संघ बनेल विश्वचषकाचा मानकरी; सेहवागची भविष्यवाणी 

नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. विराटसेनेचा फॉर्म बघून जगातील अनेक क्रिकेटप्रेमींनी हा विश्वास व्यक्त केला आहे. परंतु, भारताचा दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागने भारताला विजयाचा दावेदार मानत नसल्याचे म्हंटले आहे. शोएब अख्तरच्या रावळपिंडी एक्स्प्रेस या युट्युब चॅनेलवर सेहवागने विश्वचषकाच्या विजयी संघाची भविष्यवाणी केली आहे.

वीरेंद्र सेहवागने म्हंटले कि, विश्वचषकात इंग्लंडचा संघ माझा फेव्हरेट आहे. इंग्लंडचा संघ विश्वचषकावर नाव कोरण्याची शक्यता जास्त आहे. याची कारणे सांगताना सेहवाग म्हणाला, इंग्लंडकडे एक-दोन नव्हे तर ११ फलंदाज आहेत. आणि सात गोलंदाज आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये कोण वरचढ आहे हे सेमीफायनलमध्ये समजेलच. दोन्ही संघ ३० जून रोजी मैदानात आमने-सामने येतील. तसेच जर इंग्लंडने यंदाचा विश्वचषक जिंकला नाहीतर कधीच विश्वविजेता बनू शकणार नाही. सध्या इंग्लंडचा संपूर्ण संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडचे कर्णधार ऑयन मॉर्गनसहित अन्य खेळाडूही शानदार प्रदर्शन करत आहेत. इंग्लंड संघाचा हाच फॉर्म राहिला तर विश्वचषक त्यांचाच असेल, असे सेहवागने म्हंटले आहे.

तर दुरीकडे शोएब अख्तर इंग्लंडच्या तुलनेत भारताला मजबूत मानत आहे. त्यांच्यानुसार, भारत कोणत्याही दबावामध्ये स्वतःला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. हीच गोष्ट विराटसेनेला अन्य संघापेक्षा विशेष बनविते.

Leave A Reply

Your email address will not be published.