Puneri Paltan vs Telugu Titans, Pro Kabaddi League 2023-24 : प्रो कबड्डी लीग सीझन 10 चा 97 वा सामना पुणेरी पलटण आणि तेलुगु टायटन्स यांच्यात खेळला गेला. पाटलीपुत्र इनडोअर स्टेडियम, पाटणा येथे झालेल्या या सामन्यात पुणेरी संघाने तेलुगू टायटन्सचा 60-29 असा पराभव केला.
पुणे ने मैट पर दिखाई अपनी पलटनगिरी 💪#TeluguTitans को बड़ी हार देते हुए टेबल टॉपर बनी #PuneriPaltan की टीम 🔥#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PUNvTT pic.twitter.com/m2DT8xmb40
— ProKabaddi (@ProKabaddi) January 30, 2024
तेलुगू टायटन्सने नाणेफेक जिंकून कोर्टचा निर्णय घेतला. पुणेरी यांनी पहिली रेड टाकली होती. पहिल्या हाफपर्यंत सामन्याचा स्कोअर 29-6 असा होता. पुणेरी पलटण तब्बल 23 गुणांनी पुढे होते. पूर्वार्धात पुणेरी पलटणतर्फे अस्लम मुस्तफाने 5 गुण, अभिनेश नादराजननेही 5 गुण, मोहित गोयतने 6 गुण आणि आकाश शिंदेने 5 गुण मिळवले.
#PKLSeason10 (#PATvGG Match 96) : पाटणा पायरेट्सचा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय…
या दणदणीत विजयानंतर पुणेरी पलटणने गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. जयपूर पिंक पँथर्सची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. पाटणा लेगमध्ये पुणेरी पलटण आणि तेलुगू टायटन्सचा हा शेवटचा सामना होता. पाटणा लेगचे शेवटचे दोन सामने बुधवारी होणार आहेत.