Pro Kabaddi League :- प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल 10) शुक्रवारी झालेल्या 13व्या सामन्यात गतविजेत्या यु मुंबा संघावर पुण्याची पलटण भारी ठरली. पुणेरी पलटणने यु मुंबाचा 43-32 अशा मोठ्या फरकाने दारूण पराभव केला. पुणेरी पलटणचा या मोसमातील हा सलग दुसरा विजय असून तीन सामन्यांनंतर यू मुंबाचा हा दुसरा पराभव आहे.
मैट पर पुणेरी पलटन ने बिखेरा अपना जलवा 💥
मुम्बा के खिलाफ इस दमदार प्रदर्शन पर क्या है आपकी राय❓💬
फाइनल स्कोर 👉 43-32 #ProKabaddi #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #PUNvMUM #PuneriPaltan #UMumba pic.twitter.com/eBqnG8cSVk
— ProKabaddi (@ProKabaddi) December 8, 2023
या सामन्यात, मोहित गोयतने पुणेरी पलटणसाठी चढाई करताना सर्वाधिक 9 गुण घेतले आणि बचावात, अबिनेश नादराजन, संकेत सावंत, मोहित गोयत, गौरव खत्री आणि मोहम्मदरेझा शाडलू यांनी 3-3 टॅकल पॉइंट घेतले. यू मुंबासाठी पी राणे आणि जय भगवान यांनी प्रत्येकी 5 रेड पॉइंट घेतले. बचावात विश्वनाथने 3 टॅकल पॉइंट घेतले.
याशिवाय यू मुम्बाने एक्स्ट्रा मार्फत पुणेरी पलटणला अनेक गुण दिले. शेवटी पुणेरी पलटणने हा सामना जबरदस्त जिंकला. दुसरीकडे, माजी चॅम्पियन संघ यू मुंबाला या सामन्यात पराभवाचे अंतर 7 किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्यात यश आले नाही आणि यामुळे त्यांना एकही गुण मिळाला नाही. प्रो कबड्डी लीगच्या या सामन्यात मुंबईच्या बचावफळीने केवळ 7 गुण घेतले.
#PKLSeason10 ( #BLRvDEL Match 12) : दिल्लीचा दणदणीत विजय, बंगळुरु बुल्सचा सलग तिसरा पराभव…
दुसरीकडे प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल 10) शुक्रवारी झालेल्या 12व्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगळुरु बुल्सचा 38-31 असा पराभव करून दबंग दिल्लीने यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, बुल्सचा हा या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. दिल्लीच्या विजयात कर्णधार नवीन कुमारने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.