बिजींग – रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचा 2 ऑगस्ट पासून सुरू होणारा चीन दौरा रद्द करण्यात आला आहे. ते तेथे होणाऱ्या एका मंत्रिपातळीवरील परिषदेसाठी जाणार होते. तथापी संसद अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांनी आपला हा दौरा रद्द केला आहे.
सरकारने चालू संसद अधिवेशनाचा कालावधी 7 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. आणि कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व विषय पुर्ण करण्याचा सरकारचा निर्धार असल्यानेच त्यांना हा दौरा रद्द करण्याची सुचना करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. या दौऱ्यात ते मंत्रिपातळीरील परिषदेखेरीज चीनशी भारत-चीन द्विपक्षीय व्यापार संबंधांवरही चर्चा करणार होते.
दोन्ही देशांतील हा व्यापार सध्या शंबर अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या पातळीवर पोहचला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे या वर्षाच्या अखेरीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या पुर्व तयारीची चर्चाही या दौऱ्यात होणे अपेक्षित होते. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला गेला होता.