पिथोरागड : उत्तराखंडमध्ये बुधवारी झालेल्या भूकंपामुळे पृथ्वी हादरली. कुमाऊं विभागातील पिथोरागड येथे दुपारी 1.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.
Earthquake of Magnitude:4.4, Occurred on 22-02-2023, 13:30:23 IST, Lat:29.56 & Long:81.70, Depth: 10 Km ,Location: 143km E of Pithoragarh, Uttarakhand, India for more information Download the BhooKamp App https://t.co/MNTAXJS0EJ@Dr_Mishra1966 @Ravi_MoES @ndmaindia @Indiametdept pic.twitter.com/ovDBNhb7VO
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 22, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू पिथौरागढपासून 143 किमी दूर अंतरावर असून जमीनीपासून त्याची खोली 10 किमी होती. दिलासादायक बाब म्हणजे या भूकंपामुळे परिसरात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.