पिंपरी : एका स्नॅक्स सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास चिंचवडमधील जैन शाळेजवळ घडली.
मनी तेवर (वय 32)प्रदीप कुमार (वय 20 दोघेही रा. चिंचवड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी उपहारगृहाचे मालक तेवर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात तर कामगार प्रदीप कुमार यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन शाळेजवळ शिवा स्नॅक्स सेंटर नावाचे उपहारगृह आहे. सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास उपाहारगृह सुरू असताना अचानक सिलेंडरने पेट घेतला. यावेळी नाष्टा करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली.
यावेळी लागलेल्या आगीत दुकानाचा मालक तेवर आणि कामगार प्रदीप कुमार हे दोघे जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक मुख्यालयातून दोन बंब तसेच प्राधिकरण उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांना अवघ्या दहा मिनिटांमध्ये आग शमवण्यात यश आले.