भिंत अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

पिंपरी – गोदामाची भिंत अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी आळंदी रोडवर शनिवारी (दि. 17) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

बाबासाहेब मुंजाजी खरटे (वय 52, रा. गजानननगर, दिघी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. भोसरी आळंदी रोडवर सतीश फुगे यांच्या मालकीचे गोदाम आहे. हे गोदाम भाड्याने द्यावयाचे असल्याने त्यातील एक भिंत पाडण्याचे काम खरटे हे करीत होते. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक भिंत अंगावर पडल्याने खरटे हे गंभीर जखमी झाले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

पाच फूटाची भिंत पडून व्यक्‍ती मृत्यूमुखी पडू शकतो का?, असा प्रश्‍न खरटे यांचा मुलगा राहूल याने उपस्थित केल्याने या निधनाबाबत संशयास्पद वातावरण तयार झाले आहे. खरटे यांच्यामागे पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.