वाट अडवून तरुणीशी गैरवर्तन

पिंपरी – तरुणीचा पाठलाग करुन तिची वाट अडवून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 जून रोजी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास भोसरी येथील इंद्रायणीनगर परिसरात घडली.

याप्रकरणी पीडित 19 वर्षीय तरुणीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषी जमदाडे (रा. सहारा चौक, इंद्रायणीनगर, भोसरी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.21) सकाळी आठच्या सुमारास इंद्रायणीनगर येथील एका जिममधून व्यायाम करुन फिर्यादी तरुणी घरी निघाली होती.

यावेळी ऋषीने तिच्यासमोर गाडी आडवी लावून,मला तू आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझा नंबर अनब्लॉक कर, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तरुणीचा घरापर्यंत पाठलाग करुन तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी ऋषी विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक डेर तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.