शहरात आगीच्या दोन घटना; प्रसंगावधानाने धोका टळला

पिंपरी – कचऱ्यामुळे आग लागल्याच्या शनिवारी दोन घटना घडल्या आहेत. दुपारच्या वेळी मोहननगर व मोरवाडी येथे आग लागली होती, परंतु अग्निशामक दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. या दोन्ही घटना दुपारी एक ते दोनच्या दरम्यान घडल्या.

मोहननगर येथे शॉर्ट सर्किटमुळे पत्र्यावर पडलेल्या कचऱ्याला आग लागली. मोहननगर अग्निशामकदलाने तातडीने घटनास्थळी पोहचून आग विझवली. त्यानंतर तीच गाडी परतत असताना मोरवाडी येथे आग लागल्याचे कळले. त्याच गाडीने तातडीने घटनास्थळी जाऊन तीही आग विझवली.

मोरवाडी येथे ट्रान्सफॉर्मरमध्येही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि जवळच प्लायवूडचे गोदाम होते. ही आग विझविण्यात थोडा जरी विलंब झाला असता तर आगीने भीषण रुप धारण केले असते. या ठिकाणी पिंपरी अग्निशमनदलाच्याही गाड्या पोहचल्या आणि एकूण तीन गाड्याने मोठा भडका होण्याआधी आग विझवली. नागरिकांनी खासगी जागेत साचलेला कचरा लवकर काढावा, असे आवाहन अग्निशामक दलाने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.