पिंपरी – दुचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी कोयताचा धाक दाखवून तिघांना लुटले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लुटमार करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी चेतन गणेश सपकाळ (वय-22 रा. दापोडी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन प्रकाश कटकधोंड (वय-20), कासीम मरशद (वय-22), अमोल वाल (वय-20), साहील मुकरताल (वय-19, चौघेही, रा. निगडी), गणेश बाळासाहेब मतकर (वय-19 रा. तळवडे), निलेश खंडू राहिज या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.