पिंपरी – मोरवाडीतील आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयातील तिजोरीचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास नागरिकांनीच रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी (दि.7) रात्री घडली.
गंगाधर सुभाष शिवशरण (वय 22, रा. काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी रोमील प्रकाश कोलते (वय 26, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी रात्री आकाश एज्युकेशन कंपनीचे कार्यालय बंद झाल्यानंतर आरोपी चोरटा गंगाधर शिवशरण हा कार्यालयाच्या शटरचे कुलूप तोडून कार्यालयात शिरला. तो तिजोरीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी, रात्री कार्यालय उघडे दिसल्याने काही जणांना संशय आला. त्यांनी आतमध्ये पहाणी केली असता चोरटा तिजोरीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.