पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेकडे तीन दिवस कोव्हिशिल्ड लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद होते. महापालिकेला कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाल्याने आज शहरातील 50 केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे.
सोमवारी (दि. 9) शहरातील 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना 35 केंद्रावर किऑस्क पद्धतीने व कोविन ऍपवर स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा देण्यात येणार आहे. या केंद्रांवर कोविन ऍपवर स्लॉट बुकिंग केलेल्या व किऑस्क टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. या प्रत्येक केंद्राची क्षमता 50 असून कोविन ऍपवरील 40 व किऑस्क टोकन प्रणालीद्वारे 10 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. तसेच इतर 25 केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा देण्यात येणार आहे. शहरातील 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना आठ केंद्रावर कोव्हॅक्सिन लस पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
सर्व केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 8) सकाळी 8 वाजता स्लॉट बुकींगसाठी ओपन होतील. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रावर गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत.