राज्यात पाच कोटीहून अधिक जणांना “शिवभोजन’चा लाभ

मुंबई – राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292 थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. 15 एप्रिल ते 7 ऑगस्ट या काळात 1 कोटी 72 लाख 32 हजार 695 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

जुलै महिन्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विशेष धोरण अवलंबून पूरग्रस्त भागात मोफत 92,017 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले. म्हणजे आतापर्यंत एकूण 1 कोटी 73 लाख 24 हजार 712 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. राज्यात सद्यस्थितीत 1164 शिवभोजन केंद्र सुरू आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.