पिंपरी- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनीषा आढाव या दांपत्याचे अपहरण करून त्यांची हत्या झाली. या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि. २९) पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन केले होते.
या वेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस. बी. चांडक, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. देवराव ढाळे, ॲड. अशोक भटेवरा, ॲड. राजू माधवन, ॲड. किरण पवार, माजी उपाध्यक्ष ॲड. दत्ता झुळूक, ॲड. नवीन वालेचा, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सत्यन नायर, ॲड. सारिका परदेशी, पुणे लॉयर्स सोसायटीचे सचिव अॅड. अतिष लांडगे आदींनी निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी ॲड. दिनकर लाळगे, ॲड. अनिल शेजवानी, ॲड. सूर्यकांत काळे, ॲड. अतुल कांबळे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. कृष्णा वाघमारे, ॲड. मंगेश नढे, ॲड. सोनाली गुंजाळ, ॲड. श्रद्धा मंचरकर, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. विकास शर्मा, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. भारत सलगर, ॲड. पूजा बदे, ॲड. शुभम खैरनार, ॲड. बालाजी देशमुख , ॲड. सागर अडागळे, ॲड. प्रकाश निनाळे, ॲड. स्वाती पावडे, ॲड. अजमा मुजावर, ॲड. अमोल सोनगीरे, ॲड. अंजली रणपिसे, ॲड. पूनम शर्मा, ॲड. सचिन पाटील, ॲड. अक्षय रसाळ, ॲड. विजय भगत, ॲड. रामजी रामगुडे, ॲड.रवी अगरवाल, ॲड. शिवम कुंभार यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी या हत्येचा निषेध व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकदिवस कामकाजापासून अलिप्त राहण्याचे आवाहन त्यांनी वकिलांना करीत २ फेब्रुवारी २०२४ रोजी आझाद मैदान येथे वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऑल इंडिया लॉयर्स फेडरेशनच्या वतीने आयोजित आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवडमधील वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, वकील संरक्षण कायदा पारित करावा, सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या मागण्या उपस्थित वकिलांमार्फत करण्यात आल्या. या सभेचे आयोजन अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतिक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सह-सचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. अयाज शेख, ॲड. फारुक शेख, ॲड. अस्मिता पिंगळे आदींनी केले.